Last Update:        ई-पेपर  |  लॉग-इन
 

संपादकीय
डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. चुनेकर यांना प्रियोळकर पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 28, 2009 AT 12:51 AM (IST)
Tags: mumbai,   univercity,   award
मुंबई - ज्येष्ठ संशोधक दिवंगत प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा मुंबई विद्यापीठात सादर झालेल्या सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार यंदा लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना जाहीर झाला आहे. त्यांनी 'जागरण : एक विधिनाट्य इतिहास, वाङ्‌मय प्रयोग' हा प्रबंध सादर केला होता. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा दुसरा पुरस्कार ज्येष्ठ संशोधक डॉ. सु. रा. चुनेकर यांना मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वसंत पाटणकर यांनी हे जाहीर केले.

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत प्रपाठक असलेले डॉ. प्रकाश खांडगे यांना गुरुदेव टागोर तौलनिक अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. हरिश्‍चंद्र थोरात यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सु. रा. चुनेकर यांचे माधव ज्युलियन यांच्या संदर्भातील संशोधन सर्वश्रुत आहे.


आजचा सकाळ...
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: